Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतोषसींग चंदेलसींग रावत गोळीबाराच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद

चंद्रपूर जिल्हा पोलीसांची यशस्वी कामगिरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपुर, 23 मे –  चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसींग चंदेलसींग रावत वय 60 वर्ष रा. मुल यांचेवर दि. 11/05/2023 रोजी रात्रो 09:15 वा. ते 09:30 वाजे दरम्यान चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, शाखा मुल समोर रस्त्यावर पांढ-या रंगाच्या मारोती सुझुकी स्विफ्ट कार मधुन आलेल्या अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांना जिवे ठार मारण्याच्या उददेशाने त्यांचेवर बंदुकीने गोळया झाडल्या त्यामध्ये ते जखमी झाले, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्या संदर्भात पोलीस ठाणे मुल येथे  संतोषसींग चंदेलसींग रावत यांच्या तक्रारीवरून अप क 178 / 23 कलम 307, 34 भा.द.वि. सह कलम 3. 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एकुण 16 पथके तयार करून पाहीजे असलेल्या आरोपींची शोध मोहीम राबवीली. तमासादरम्यान आरोपींनी स्वतःची ओळख लपविण्यासाठी बुरखा परीधान केला होता तसेच गुन्हयात वापरलेल्या गाडीची ओळख लपविण्यासाठी बनावट वाहन क्रमांक वापरल्याचे दिसुन आले. आरोपी व वाहनाच्या शोध मोहीमे दरम्यान विविध तपास पथकांमार्फत कौशल्यपुर्ण तपास करण्यात आला. या पथकांकडुन केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान ईसम नामे 1) राजवीर कुंवरलाल यादव वय 36 वर्ष व 2 ) अमर कुंवरलाल यादव वय 29 वर्ष, दोन्ही रा. चंद्रशेखर आझाद चौक बाबूपेठ चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल विचारणा केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यातील फिर्यादी यांनी आरोपींचे मार्फत काही मुलांकडुन वे. को. लि. मध्ये नौकरी लावुन देतो म्हणुन पैसे घेतले होते परंतु त्यांना नोकरी लावुन दिली नाही व घेतलेली रक्कम सुध्दा वारवार मागुनही परत केली नाही याचे रागातून आरोपींनी फिर्यादी यांचेवर जिवे मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून पसार झाले होते असे प्राथमिक तपासावरून दिसुन आले आहे. तरी आरोपींकडे गुन्हयाबाबत सर्वकष दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.