Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू

मुंबईतल्या मानखुर्दमध्ये हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. जन्मदाता बापानं आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, ३० जून : मुंबईतल्या मानखुर्दमध्ये हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. जन्मदाता बापानं आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. एका बापानं आपल्या पोटच्या तीन मुलांना आईस्क्रिममधून विष (Poison) दिलं आहे. यात एका ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल आहे तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मुलांच्या आईच्या तक्रारीनंतर मानखुर्द पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी बापावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून चिडलेला आरोपी वडील मोहम्मद अली यानं आपल्या तीन मुलांच्या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळवलं होतं. या घटनेत ५ वर्षांचा अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे. तर ७ वर्षांची अलीना आणि २ वर्षांचा अरमान मानखुर्दमधील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यपालांनी पाठवले ठाकरे सरकारला पत्र, मुख्यमंत्र्यांना करून दिले स्मरण

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.