Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चातगाव येथील मंडळ अधिकाऱ्यासह रांगी येथील तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

१३ हजार रूपयांची स्विकारली लाच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली०७ डिसेंबर : जबरानजोतची नोंदणी करण्याच्या कामाकरिता १३ हजार रूपयांची लाच स्विकारतांना गडचिरोली जिल्हयातील चातगाव येथील मंडळ अधिकारी व रांगी येथील तलाठयाला लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. प्रमादे फकीराजी वारजुरकर (५७) रा. चातगाव असे लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे तर पुरूषोत्तम त्र्यंबक तुलावी (४६) साझा क्र.१४ रांगी असे लाचखोर तलाठयाचे नाव आहे. सदर कारवाईमुळे महसुल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे रांगी ता. धानोरा जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन ते शेतीचा व्यवसाय व कापड दुकान चालवितात. त्याचे सर्वे क्र ६२ ला लागुन असलेल्या जमीनीवर जबरानजोतची नोंदणी करण्याकरिता कार्यालयात जावून भेटले असता जबरानजोतची नोंदणी करण्याच्या कामाकरिता तक्रारदार यांना मंडळ अधिकारी प्रमादे फकीराजी वारजुरकर व रांगी येथील तलाठी पुरूषोत्तम त्र्यंबक तुलावी यांनी १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. मात्र लाचेची रक्कम देण्याची तक्रारदार यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान चातगावचे मंडळ अधिकारी प्रमोद वारजुरकर व तलाठी पुरूषोत्तम तुलावी यांनी संगनमत करून जबरानजोतची नोंद त्याच्या नावे करण्याकरीता १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. व तडजोडीअंती १३ हजार रूपये लाच रक्मक रांगीचे तलाठी पुरूषोत्तम तुलावी यांनी स्वतः कार्यालय रांगी येथे स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. चातगावचे मंडळ अधिकारी प्रमोद वारजुरकर व तलाठी पुरूषोत्तम तुलावी यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन धानोरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायादयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोन्ही आरोपींच्या निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाव्दारे झडती सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, सफौ मोरेश्वर लाकडे, पोहवा नत्थु धोटे, नोपोशी सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, पोशि महेश कुकुडकार, किशोर ठाकुर, चानापोशि तुळशीराम नवघरे सर्व ला.प्र.वि.गडचिरोली यांनी केली

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.