Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जुनं प्रेम पुन्हा फुलविण्यासाठी प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या अल्पवयीन चिमुरड्याचे केले अपहरण

पोलिसांनी 12 तासाच्या आत आरोपीला ठोकल्या बेळ्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक दि ४ एप्रिल : प्रेमसंबंध असलेल्या प्रेमी सोबत विवाहित प्रेयसीने जाण्यास नकार दिल्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या चार वर्षीय चिमुरड्याचे घरा बाहेरून अपहरण करून गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रेमी आरोपीस नाशिक रेल्वे स्थानकात शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या 12 तासात ताब्यात घेत अटक केली आहे .

पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार टेमघर येथील चाळीत राहणारे मोहम्मद अली फकीर व त्याची पत्नी आयशा बीबी आपल्या चार वर्षीय आशिक अली या मुलासह राहत असताना 3 एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा घरा बाहेर आढळून न आल्याने त्याचा शोध घेऊन ही न सापडला नाही.त्यामुळे सायंकाळी सात वाजता चिमुरडा आशिक अली याची आई आयशा बीबी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या हरवल्याची तक्रार दिली.पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याच दरम्यान मुलाच्या आई सोबत पाच वर्षां पासून प्रियकर असलेल्या रिपोन व्यापारी याने मोबाईल वर फोन करीत तुझा मुलगा माझ्या जवळ असून तू माझ्या सोबत राहायला ये असे सांगत न आल्यास मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यासाठी आरोपीने मुलाच्या आईस नाशिक येथे येण्याची गळ घातली.ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे ,पोहवा अनिल शिरसाठ, रिजवान सैय्यद,शांताराम चौरे,किरण मोहिते या पथकाने तातडीने पावले उचलत दोन पथक बनवून आरोपीस पकडण्यासाठी कारवाई सुरू केली.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यासाठी मुलाच्या आई सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे या स्वतः रेल्वेने नाशिक येथे पोहचल्या.तेथील रेल्वे स्टेशन च्या ब्रिज वर आरोपी रिपोन व्यापारी उभा असल्याचे आढळून आल्या नंतर महिला पोलीस अधिकारी मुक्ता फडतरे यांनी त्याच्या शिताफीने मुसक्या आवळत अपहरण झालेल्या चिमुरड्याची सुटका करून अवघ्या बारा तासात या गुन्ह्याची उकल केल्याने पालकां सोबत पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

https://youtu.be/KotAuXKmVcw

 

Comments are closed.