Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात ट्रकच्या धडकेत तरूण ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर,दि. ६ डिेसंबर : ट्रक चालकाने दुचाकाला मागून जोरदार धडक दिल्याने  दुचाकीवर मागे बसणाऱ्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
मृतामध्ये पीयुष गिरीधारी मानकर (१८) रा. चिखली वस्ती, कळमना याचा समावेश आहे. पीयुष त्याचा मित्र धीरज रामराव झांगडे (२१) याच्या बजाज पल्सर वाहन क्र. एमएच/४९/एव्ही/०९८९ ने मागे बसून जात होता. पारडी हद्दीतील जित धाब्याजवळ, भंडाराकडून नागपूरकडे येणाऱ्या रोडवर एक अज्ञात चालक भरधाव ट्रक चालवित आला. त्याने निष्काळजीपणे व हयगयीने ट्रक चालवित पीयूषच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, काही अंतरापर्यंत दुचाकी फरफटत गेली. खाली पडून दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातात पीयूषचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. धडक देऊन ट्रक चालक फरार झाला. अपघात झाल्याचे वाहतूक धाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर पारडी पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी दोघांना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविले. याप्रकरणी धीरज याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे. या मार्गावर ट्रक सारखे जड वाहतूक करणारे नेहमीच भरवेगाने वाहन चालवित असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.