Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यापीठातील सद्यस्थितीतील घडामोडींचा आढावा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १३ डिसेंबर : बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली विद्यापीठाची भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागलेली आहे. ७ डिसेंबर २२ ला पासून खरेदीची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

विद्यापीठाच्या २०८ एकर जमीनीपैकी ३५ एकर जमीनीची थेट खरेदी झालेली होती. अधिक १५ एकर शासकीय जमीन प्राप्त झालेली आहे. उर्वरित ६४.८० हेक्टर आर जमिनीची खरेदी ७ डिसेंबर पासून सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी संजय मीना आणि कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आलेले आहे.आतापर्यंत ३३.५० एकर जमीनीची खरेदी झालेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागली असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मागील एका वर्षाच्या कालावधीत अविरत प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नात शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक सहभाग दर्शविला. विद्यापीठाच्या विकासाला आवश्यक असणारी महत्त्वाची बाब म्हणजे जमीन आहे. त्यामुळे विद्यापीठ विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.लवकरच संपूर्ण जमीन अधिग्रहित होईल .असा विद्यापीठ प्रशासनाला विश्वास आहे.

विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतःचे सभागृह असावे यासाठी ३०० आसन क्षमतेचे सभागृह , व्हीआयपीचे दोन सूट असलेले अतिथी गृह आणि खुले रंगमंच्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१७० कोटीचे टाटा टेक्नॉलॉजीचे ‘स्किल डेव्हलपमेंट’सेंटर विद्यापीठात सुरू होतंय. विद्यापीठांने आपल्या जागेपैकी १ एकर जागा या सेंटरसाठी दिलेली आहे . येत्या पंधरा दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. सहा महिन्यांमध्ये यातून निर्माण होणारे सर्व विद्यार्थी अतिशय कौशल्य पूर्ण आणि रोजगारक्षम असतील. जिल्हा प्रशासन व नगर प्रशासन यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट होऊ घातलाय.

जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अल्फा अकॅडमी’ ची स्थापना करण्यात आलेली आहे. आपल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आयटीचे अद्यावत ज्ञान देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवणे हा या अकॅडमी चा उद्देश आहे. ६५० विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून १५ डिसेंबर पासून प्रशिक्षण सुरु होणार आहे.

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागाची अद्यायावत प्रयोगशाळा तयार झालेली आहे.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, चंद्रपूर येथील सर्वोदय शिक्षण मंडळ आणि सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचे, स्व. मनोहरराव म्हैसाळकर स्मृती ६८ वे ‘विदर्भ साहित्य संमेलन’ या संमेलनाचे आयोजन दिनांक १६,१७ आणि१८ डिसेबंर२०२२ ला होत आहे. प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग यांच्या अध्यक्षतेत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे हे संमेलन तिन दिवस चालणार आहे. संमेलनाचे उत्तम आयोजन व्हावे यासाठी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.

ग्रंथदिंडीनंतर संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, १६ डिसेंबरला १० वा. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून, त्यावेळी प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. श्रीराम कावळे, ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन हिंगणा चे पुर्वाध्यक्ष डॉ. मधुकर रामदास जोशी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा , ज्येष्ठ विचारवंत,नागपूर, डॉ. फिरदौस मिर्जा ज्येष्ठ विधीज्ञ नागपूर उपस्थित राहतील.

संमेलनात ग्रंथ प्रदर्शन ,शिल्प आणि चित्रांचे दालन राहणार असून, साहित्य आणि संस्कृतीवर विचारमंथन होईल. कथाकथन, पाच चर्चासत्रे, अनुभकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कवींचे स्वतंत्र संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि २ नाटके या संमेलनात सादर होतील. १७ डिसेंबर रोजी स्वरवेद नागपूर निर्मित पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक या संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे हे उपस्थित राहतील.

१८ डिसेंबर रोजी समारोपीय उद् घाटन सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ विचारवंत नागपुर डॉ. वि.स.जोग, विशेष अतिथी चंद्रपूर -आर्णी खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्र, आमदार चिमूर- ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र विजय वडेट्टीवार, आमदार भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्र प्रतिभा धानोरकर,स्वागत अध्यक्ष कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या साहित्य संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

ऑस्ट्रेलीयातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ घ्यावा : स्वानंद कुलकर्णी

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने नाशिकमध्ये तणाव..!

 

Comments are closed.