Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून शेळीपालन प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २१ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मागदर्शनाखाली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक शेतकऱ्यांना शेळीपालन प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम दि. २१/१२/२०२२ रोजी बिओआय आरसेटी कार्यालयात पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने शेळीपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, पेंढरी, अहेरी व कुरखेडा येथील ३५ महिला-पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ०९ पुरुष व २६ महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. दिनांक १२/१२/२०२२ ते २१ / १२ / २०२२ पर्यंत एकुण १० दिवसाच्या या प्रशिक्षणात तज्ञांच्या मार्फतीने शेळयांच्या जाती, चारा व्यवस्थापन व लसीकरण संदर्भात प्रशिक्षण व उद्बोधन करुन, शेळीपालन व्यवसाय उभारणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मार्गदर्शन करतांना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी सांगीतले की, पशुसंवर्धन विभागाकडून गायी, म्हशी, शेळी-मेंढी वाटप करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेकरीता अर्ज भरण्याची सुविधा पोलीस स्टेशन स्तरावर दादालोरा खिडकिच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. असे सांगून शेळी पालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच बेरोजगार युवक-युवतींना ब्युटीपार्लर १४०, कुक्कुटपालन ५३१, बदक पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला २४२, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण १०६२, टु व्हिलर दुरुस्ती ६४, मत्स्यपालन ८७, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ५९, टु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ४७४१ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,  यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी बीओआय आरसेटी, गडचिरोलीचे संचालक कैलास बोलगमवार हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभाग तसेच पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व अधिकारी / अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : 

ट्रॅकिंग सेलच्या माध्यमातुन अतिजोखमीच्या मातांची पाठपुरावा मोहीम

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरी- नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम

 

Comments are closed.