Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात ध्वजारोहण संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.१५ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ७.३० वा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.    

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, पावसाचा विचार न करता, ओले होण्याची तमा न बाळगता स्वातंत्र्या प्रति आपले निष्ठा व्यक्त करण्यासाठी, स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी तुम्ही सगळे इथे उत्साहाने जमले. ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी अती दुर्गम भागात संपर्क अभियान राबवून तळागाळातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी प्रयत्न केले. विद्यापीठात करत असलेल्या कामातूनच आपली आणि विद्यापीठाची ओळख तयार होत असते असे ते म्हणाले. ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या यावेळी त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कालावधी दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले. सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, संचालक परिक्षा व मुल्य मापनमडंळ डॉ. अनिल चिताडे , संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. शाम खंडारे यांच्यासह विद्यापीठातील सर्व संविधानिक अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..

अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ.. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील हृदयद्रावक घटना..

 

Comments are closed.