Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस दादालोरा खिडकी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचणी निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपारीक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपारीक शेतीपध्दतीत बदल करतील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे  यांचे मार्गदर्शनातुन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा भागातील 46 शेतकऱ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने चौथ्या कृषीदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यापुर्वी सुध्दा पोमके कोटमी हद्दीतील ३२ महिला शेतकऱ्यांची तसेच उपविभाग भामरागड हद्दीतील ४० शेतकऱ्यांची त्याप्रमाणे धानोरा, हेडरी व एटापल्ली उपविभागातील ४२ शेतकऱ्यांची कृषी सहल आयोजीत करण्यात आली होती. या चौथ्या सहलीमध्ये अहेरी, जिमलगट्टा, सिरोंचा उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील अतिदुर्गम भागातील ४६ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी हे नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, राहुरी, बारामती, पुणे, बाभळेश्वर, औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, पैठण, अंबेजोगाई, परभणी, पोखर्णी तसेच ताडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एतिहासीक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ येथील प्रसिध्द लेण्या व गुफांना भेटी देणार असून, महाराष्ट्र राज्यातील शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्यातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनात आयोजीत करण्यात आला असून, आज दि. १६/१२/२०२१ पासुन दि. २५/१२/२०२१ रोजी पर्यंत १० दिवस आयोजीत करण्याचे नियोजन करण्यात येवून, या चौथ्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यकमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी अमोल ठाकुर,  उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर,  उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा सुहास शिंदे, त्याचप्रमाणे वरील तिन्ही उपविभागातील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : 

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा

जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थांनी ३ डिसेंबर पर्यंत सादर प्रस्ताव समितीने निकाली काढल्याबाबत

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

 

 

 

Comments are closed.