Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेंढा- लेखा गावाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेल अभ्यासातून प्राध्यापकांना नवी दिशा मिळेल प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. 02: मेंढा- लेखा गावाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेल या विषयावरील अभ्यास प्रशिक्षणामधून सहभागी प्राध्यापकांना निश्चितच नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकॅडमी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “मेंढा-लेखा : लोकशाही व स्वशासन मॉडेल” या विषयावर मेंढा लेखा येथे आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसीय (FDP) प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मेंढा लेखा गावच्या सरपंच, सौ. नंदाताई दुग्गा, सामाजिक कार्यकर्ता देवाजी तोफा, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकॅदमीचे संचालय डॉ. कल्याणी गोखले, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम, प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. हेमराज निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

श्रीराम कावळे म्हणाले, मेंढा- लेखा गावचे लोकशाही व स्वशासन मॉडेल अनुभववादी असून याचा गांभीर्यपूर्वक अभ्यास व संशोधन करणे महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणामुळे प्राध्यापकांना नवा विचार व एक सामजिक दृष्टी मिळेल. हे प्रशिक्षण २ ते ४ डिसेंबर या कालावधीत होणार असून यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, अमरावती, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमधून प्राध्यापक सहभागी झाले असून कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती डॉ. प्रिया गेडाम यांनी प्रास्ताविकात दिली.

प्रशिक्षण कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. नरेश मडावी, फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रुपेंद्रकुमार गौर, महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कुंदन दुपारे
यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. आभार डॉ. हेमराज निखाडे यांनी मानले.

Comments are closed.