Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समर इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला चालना; ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा अभिनव उपक्रम

0

लोकस्पर्श न्यूज, 

चंद्रपूर, दि. २० : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत वने व वन्यजीव अधिवासाच्या विकासाकरिता विविध स्वरुपाची विकासात्मक व संशोधनात्मक कामे नियमित करण्यात येत असतात. यामध्ये वन्यजीव व सामाजिक संशोधन, स्थानिकांसाठी रोजगाराच्या पर्यायी संधी, कुरण विकासाच्या माध्यमातून अधिवास व्यवस्थापन, निसर्ग पर्यटनातून रोजगार निर्मिती, आर्टिफिशल इंटलीजन्सच्या माध्यमातून मानव-प्राणी संघर्ष कमी करणे, जीआयएस मॅपिंग, प्राथमिक कृतीदलाच्या माध्यमातून मानव-प्राणी संघर्ष टाळणे, अशा विविध कृतीशील कार्यक्रमाद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी उन्नत विकासाची कामे करण्यात येत आहे.

या सर्व विविध पैलुच्या उपक्रमांना अधिक बळकळता यावी याकरिता समर इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध महत्वपूर्ण विषय समाविष्ट केले असून भारतातील एकूण १४ इंटर्नची निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम ५ मे २०२४ ते 30 जून २०२४ पर्यंत असणार आहे. या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अहर्तानुसार विषय देण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक कार्य केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

असे आहेत विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य : पाळीव गुरांसाठी शेतकरी गरजेनुसार चारा लागवड करणे व मॉडेल चाऱ्याचे गाव उभारणे हे अनंव्यय जांभूळकर या इंटर्न विद्यार्थ्यांचे ध्येय आहे. सामाजिक संशोधनातून ४ गावांचा अभ्यास करण्यात आला, ज्यातील ३ गावे संपूर्णपणे निसर्ग पर्यटनावर आधारित असून आनंदी आहे तर एक गावामध्ये पर्यायी रोजगार निर्मितीची आवश्यकता आहे, असे भक्ती शिर्के व शनया चौघुले या विद्यार्थिंनीच्या निष्कर्षातून माहिती प्राप्त झाली. वनात सोडण्यात आलेल्या पांढऱ्या पिठाच्या गिधाडांना कॅटिव्ह मध्ये ठेवण्यात आल्याने दैनंदिन जगण्याच्या व्यवहाराचा अभ्यास अक्षय नन्नावरे हा विद्यार्थी करत आहे. या व्याघ्र प्रकल्पातील मगर संदर्भातील शास्त्रशुद्ध अभ्यास व त्यांची संख्या याबदल वैज्ञानिक पद्धतीने प्रियेष्टा बन्सल ही विद्यार्थिनी करत आहे.

ताडोबातील बांबूला ४० वर्षांनी फुलोरा आलेला असून त्यांचे जीआयएस मॅपिंग हे राणोजी पाटील, श्रीयांश शितोळे, रोहित पाटील व दक्ष सिंग करत आहे. आर्टिफिशल इंटलीजन्स मध्ये इंजिनियर असलेल्या अनिकेत शिंदे हा विद्यार्थी मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी अलर्ट प्रणाली वर काम करतोय. लावण्य वाडीभस्मे या बायोटक इंजिनियरींगचा विद्यार्थी घनकचरा व्यवस्थापन पद्धतीवर काम करून प्राथमिक स्थरावर असतांना कचरा व्यवस्थापन करण्याचे काम करतोय. जहान असेर हा मिडिया व्यवस्थापनचा विद्यार्थी व्याघ्र प्रकल्पातील उत्तम कार्याविषयी माहिती पट तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करतोय. भाग्यश्री आखरे ही विद्यार्थीनी बफर क्षेत्रातील 18 गावांमध्ये सुरु असलेल्या पारंपारिक रोजगार व भविष्यात असलेली रोजगाराची गरज या विषयी अभ्यास करत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा उपक्रम मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांच्या सहकार्याने सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक नेमून देण्यात आलेले असून त्यांच्या मार्गदर्शनात सदर प्रकल्प सुरु आहे. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून पर्यावरण शिक्षण अधिकारी प्रफुल्ल सावरकर जबाबदारी सांभाळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.