Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोरी केंद्रात शिक्षण परिषदेचे आयोजन शिक्षक व मुख्याध्यापकांनी घेतला लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी ३० जुलै

अहेरी तालुका मुख्यालयापासुन बारा किलोमीटर अंतरावरील बोरी येथील जि.प.केंद्र शाळेच्या बालभवन सभागृहात बोरी केंद्राची पहिली शिक्षण परिषद संपन्न झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल हे होते तर प्रमुख उपस्थिती उच्च श्रेणी मुख्याध्यापक गोपाल खेवले,राजु आत्राम विषय साधन व्यक्ती कु.सुषमा खराबे (भोयर),राजु नागरे,पदवीधर शिक्षीका लक्ष्मी कुसराम,प्रकाश दुर्गे हे उपस्थित होते.

शिक्षण परिषदेत प्रामुख्याने ‘सेतु अभ्यासक्रम, व त्याची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर साधन व्यक्ती कु.सुषमा खराबे(भोयर ) यांनी मार्गदर्शन केले.सेतु अभ्यासक्रमाची गरज व यात शिक्षक,मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची भुमिका याबाबत प्रकाश दुर्गे यांनी मार्गदर्शन केले तर सेतु अभ्यासक्रमाचे मूल्यमापन व नोंद याबाबत विषेश तज्ञ राजु नागरे यांनी मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सेतु अभ्यासक्रम राबविताना येना-या अडचणी व त्यावर उपाय तसेच शिक्षकांच्या शंकांचे समाधान केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल यांनी केले.व हा अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत प्रत्येक शिक्षकांनी शासनाचे परिपत्रक,घटक संच, व डायट प्राचार्य यांनी तयार केलेल्या व्हीडीओचा सखोल अभ्यास करुन शाळेत त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्र प्रमुख प्रफुल्ल मंडल यांनी केले.

शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजु आत्राम यांनी केले तर संचालन शिक्षिका कु.शैलजा गोरेकर यांनी केले.उपस्थितांचे आभार संतु नलगुंठा यांनी मानले.या शिक्षण परिषदेचा लाभ बोरी केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घेतला.या परिषदेत पंचेचाळीस शिक्षक सहभागी झाले होते.ही शिक्षण परिषद यशस्वितेसाठी बोरी केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य मीळाले.

 

हे देखील वाचा

आठ लाख बक्षीस असलेल्या जहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण https://loksparsh.com/maharashtra/extremist-naxalite-couple-surrenders-before-gadchiroli-police/19479/

Comments are closed.