Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्‍ह्यातील सामाजिक न्‍याय विभांगातर्गत येणा-या दिव्‍यांगांच्‍या शाळा १ मार्चपासून सुरू होणार – जिल्हाधिकारी डॉ. भोसले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहमदनगर, दि. २६ फेब्रुवारी :  सामाजिक न्‍याय विभागांतर्गत येणा-या जिल्‍ह्यातील सर्व प्रकारच्‍या दिव्‍यांगांच्‍या विशेष शाळा, कार्यशाळा १ मार्च २०२२ पासून सुरू करण्‍याचा निर्णय आजच्‍या जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकीत घेण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

या बैठकीला निवासी उपजिल्‍हाधिकारी संदिप निचित, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. संजय घोगरे, सहाय्यक आयुक्‍त समाजकल्‍याण राधाकिसन देवढे, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, महानगरपालिकाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राजुरकर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले म्‍हणाले, कोविड १९ विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्व प्रकारच्‍या निवासी, अनिवासी, मतिमंद, मुखबधिर, अस्थिव्‍यंग व इतर प्रवर्गाच्‍या दिव्‍यांग शाळा व कार्यशाळा शासन आदेशान्‍वये बंद होत्‍या. त्‍या आता १ मार्च २०२२ पासून सुरू करण्‍याचा निर्णय राज्‍याच्‍या शिक्षण व क्रिडा विभागाच्‍या २० जानेवारी २०२२ च्‍या शासन परिपत्रकान्‍वये व सामाजिक न्‍याय विभागाच्‍या १६ फेब्रुवारी २०२२ च्‍या शासन परिपत्रकान्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकारानुसार स्‍थानिक परिस्थितीचा विचार करुन या शाळा सुरू करण्‍याचा निर्णय आजच्‍या बैठकीत घेण्‍यात आला आहे, असे त्‍यांनी यावेळी सांगितले.

.हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी, शासन निर्णय जारी

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग…

राज्यसरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Comments are closed.