Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑस्ट्रेलीयातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ घ्यावा : स्वानंद कुलकर्णी

थेट ऑस्ट्रेलियातून गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.13 डिसेंबर : जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली या कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना स्वानंद कुलकर्णी, अन्न सुरक्षा लेखापाल, ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन करताना नवउद्योजकांना ऑस्ट्रेलियातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींचा लाभ घेण्याचे आव्हान केले.

ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय चालु करणे, ऑस्ट्रेलियातील शेती व भारतातील शेतीमधील फरक व ऑस्ट्रेलियातील शेतीमध्ये मोठ्याप्रमाणात स्वयंचलनाचा वापर, संरक्षित शेती याविषयी माहिती दिली. डॉ.पोटदुखे, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र तज्ञ, डॉ.पं.दे.कृ.वि. नागपुर यांनी अझोला तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करुन नत्रखतांचा वापर कमी करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.भालचंद्र ठाकुर, संचालक, रुची ग्रुप ऑफ कंपनी यांनी ड्रॅगन फ्रुट या नाविण्यपुर्ण फळ पिक लागवडीविषयी माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील जमिन व हवामान ड्रॅगन फ्रुट लागवडीस पोषक असुन सुरुवातीला कमी क्षेत्रावार प्रायोगिक तत्वावर लागवड करुन नंतरच मोठ्याप्रमाणात लागवड करावी असे सांगितले. तसेच ड्रॅगन फ्रुट फळपिकाचे रोपे फक्त शासनमान्य रोपवाटींकांमधुन घेण्याचे आव्हान केले. डॉ.यशवंत उमरदंड, पशुधन विकास अधिकारी यांनी आधुनिक पध्दतीने शेळीपालन विषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले.

शेळीपालनकरीता स्थानीक जातीवंत शेळ्यांचा उपयोग करावा, शेळी / बोकडांची निवड, आहार, रोग, लसीकरण वेळापत्रक, दैनंदीन घ्यावयाची काळजी इ. विषयी माहिती दिली. डॉ. संदिप कांबळी, तेलबियाणे शास्त्रज्ञ, डॉ.पं.दे.कृ.वि. नागपुर यांनी मोहरी, जवस या तेलबियाणे पिकाच्या लागवडी विषयी, माहिती दिली. दिनांक १३/१२/२०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सवाच्या दुस-या दिवशी मोठ्यासंख्येने शेतकरी बंधु व भगिनींनी प्रदर्शनीला भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच कृषि प्रदर्शनामध्ये उपस्थित आत्मा, माविम व उमेद यांच्या गटांकडुन मोठ्याप्रमाणात मुल्यवर्धीत पदार्थ व शेतमाल यांची विक्री झाली. तरी भरपुर संख्येने शेतकरी बांधवांनी व गडचिरोलीतील नागरीकांनी कृषि प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा कृषि महोत्सव समिती, गडचिरोली यांनी केले.

हे देखील वाचा: 

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने नाशिकमध्ये तणाव..!

Comments are closed.