Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई 28 फेब्रुवारी:- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे. तो ब्लॉग बघितल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. बिग बींची परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांना नक्की काय झालं आहे? त्यांना कोणत्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे बिग बीच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ असं ब्लॉकच्या माध्यमातून सांगत त्यांनी प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. बिग बीचं हे छोटं वाक्य चाहत्यांच्या मनातील चिंता वाढवत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.