Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील कलाकार झळकणार टीव्हीवर…..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली  20 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांना अभिनय क्षेत्रात वाव मिळावा म्हणून मिसेस इंडिया २०२१ मनीषा मडावी, शितल मेश्राम कोसे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट गडचिरोली व आर आर प्रोडक्शन,ड्रीम टाऊन फिल्म स्टुडिओ तळेगाव पुणेचे चालक डायरेक्टर आणि ऍक्टर राहुल रेड्डी यांच्या प्रयत्नाने अल्बम सॉंग च्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. हे शूटिंग गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव, बोदली मेंढा व गडचिरोली शहरात करण्यात आले. या सॉंग मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गरीब परिस्थितीतील आदिवासी मुलांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणकोणत्या परिस्थितीला तोंड देऊन सामोरे जावे लागते याचे जिवंत दाखले दाखवण्यात आलेल्या या गाण्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गडचिरोली जिल्ह्यातील स्पर्धकांचा संघर्ष बघायला मिळणार आहे. या अल्बम सॉंग मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांचा सहभाग असून अप्रतिम असे अभिनय कौशल्य दिसत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अल्बम सॉंग मध्ये मुलांच्या भूमिकेत वेदांत वराटकर (९) गडचिरोली रियांश दहीकर,(८) गडचिरोली, आईच्या भूमिकेत अन्नपूर्णा प्रभुदास शिडाम – मेश्राम वनरक्षक (३३) गडचिरोली, तर ग्रुप लीडर च्या भूमिकेत स्वतः मनीषा मडावी मिसेस इंडिया २०२१ , संघर्ष करणाऱ्या स्पर्धकांच्या भूमिकेमध्ये आकर्षण विलास नैताम (१४)गडचिरोली,अवनी विलास नैताम(११) गडचिरोली ,दिपक इंद्रशहा भुके बंजारावूड फिल्म ऍक्टर(२२)गोकुळ नगर गडचिरोली, श्रावणी विठ्ठल उईके(१७) कुरखेडा , कांचन मधुकर कन्नाके कोवे वनरक्षक (२८)आष्टी, उदय नरोटे (२८)पल्लवी नरोटे (३०)गडचिरोली यांचा सहभाग आहे. हा सॉंग लवकरच टीव्हीला पाहायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांनी हा अल्बम सॉंग जरूर पहावा, आणि आदिवासी जिल्ह्यातील मुलांच्या कलागुणांना वाव दिला तर ते काय करू शकतात. हे समजून घ्यावे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.