बलवान समाज दिसला असता…..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विकास साळवे, पुणे
स्वार्थासाठी मतांचा जर का लिलाव केला नसता,
सोशीक समाज आजचा बलवान दिसला असता.. ।।धृ।।
भक्ती रसात आजवर जे जे बुडाले,
इतिहास साक्षी त्यांचे मेंदु गुलाम झाले..
विचारांची लढाई जर का विचाराने लढला असता..
सोशीक समाज आजचा बलवान दिसला असता.. ।।१।।
बिनदिक्कत आमुच्या माना त्यांच्याच खांद्यावर होत्या,
विश्वासघात करून आमुचा मानाच पिरगळल्या होत्या..
विश्वासाचा हात जर का कायम दिला असता..
सोशीक समाज आजचा बलवान दिसला असता.. ।।२।।
बा भिमाला झाकून इथे कुणीच मोठा होणार नाही,
भिम वादळाला गारद्यांनो कधीच रोखू शकणार नाही..
गनिमी काव्याने समाजाशी जर का गद्दारला नसता..
सोशीक समाज आजचा बलवान दिसला असता.. ।।३।।
कुणीच आम्हा इथे खरा वालीच उरला नाही,
कुणीच आम्हासाठी इथे ख-याने झुरला नाही..
आम्हासाठी इमाने जरा का विकास लढला असता..
सोशीक समाज आजचा बलवान दिसला असता.. ।।४।।
Comments are closed.