Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘मेहंदी’ फेम अभिनेता फराज खान अभिनेत्याचे निधन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फराज गेल्या काही काळापासून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर या आजाराशी झुंज देत होता. अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरद्वारे फराज खानच्या मृत्यूची दुखःद बातमी चाहत्यांना दिली आहे.

‘दु: खी मनाने, मी आपणा सर्वांना एक वाईट बातमी देत ​​आहे की, फराज खानने हे जग सोडले आहे. आपण केलेल्या सर्व मदतीसाठी आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रर्थानांबद्दल धन्यवाद. जेव्हा त्याच्या कुटुंबाला मदतीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा, आपण सगळे मदत करण्यासाठी पुढे आलात. आता त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. फराजच्या जाण्याने मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे’, असे ट्विट करत पूजा भट्टने आपले दुःख व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.