Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘शर्वरी’ लघूचित्रपटातून टाकला स्किझोफ्रेनिया आजारावर प्रकाश.

- मनोरंजनातून समाजजागृतीचा प्रयत्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 30 जुलै :- आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर प्रस्तुत, मायबोली झाडीपट्टी प्रोडक्शन निर्मित ‘ शर्वरी ‘ हे लघूचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून ‘ स्किझोफ्रेनिया ‘ आजारावर प्रकाश टाकण्यात आला आहे.चित्रपटाचे निर्माता-लेखक-दिग्दर्शक राहुल पेंढारकर यांनी चित्रपटाविषयी माहीती देताना म्हंटले आहे की, ‘जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यापैकी बरेच आजार आपल्याला माहितही नसतात. काही आजारावर इलाज नाही. यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. आजार केवळ शारीरिकच नसतात, तर मानसिक आजारही बरेच आहेत, जे आपल्याला माहित नसतात किंवा ओळखता येत नाहीत. असाच एक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. बर्‍याच लोकांना या आजाराबद्दल माहितीही नसते. स्किझोफ्रेनिया एक जटिल आणि गंभीर मानसिक आरोग्याचा विकार आहे, जो मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम करतो. लोकांचे मन भ्रष्ट होऊ लागते, त्यांच्या डोक्यात भ्रामक विचार, उच्छृंखल वर्तन आणि विचार येतात. हा विकार एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो आणि त्याला आजीवन उपचाराची आवश्यक असते. चित्रपटात ‘ स्क्रिझोफरेनिया ‘ आजाराने ग्रस्त असलेल्या एका लेखकाची कथा दर्शवण्यात आली आहे. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन राहुल पेंढारकर यांनी केले असून संतोष बारसागडे, टिना उराडे, बिरबल रॉय, सारिका यशवंत, राहुल पेंढारकर हे कलावंत विविध भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात प्रविण धगे यांनी संगीत दिले असून ‘झालीवूड धमाका’ या यूट्यबचॅनलवर लवकरच लघुचित्रपट प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती निर्माता, लेखक, दिग्दर्शक राहुल पेंढारकर यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘झाडीपट्टी रंगभूमी’ येथील कलावंतांचे मुक्त विद्यापीठ आहे.

-झाडीपट्टीची नाटकं ही सिजनिबल असतात. त्यामुळं नाटकाचे सिजन संपले की अनेक कलावंताना नाटकाच्या सिजनची वाट बघत रहावी लागते. शिवाय त्यांना मुंबई-पुणे गाठून मोठ्या चित्रपटात काम करणं शक्य नाही. ‘ मायबोली झाडीपट्टी प्रोडक्शन’
येथील पन्नास पेक्षा जास्त होशी कलावंताना वेब सिरीज मधे संधी देणार आहे. येथील बहुतांश कलावंत हे अभिनयाचे कुठलेली तांत्रिक शिक्षण घेतलेले नाहीत. तरीही ते झाडीच्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत आहेत, हे केवळ झाडीपट्टी रंगभूमीमुळेच शक्य झाले आहे. त्यामूळे ‘झाडीपट्टी रंगभूमी’ ही येथील कलावंतांचे मुक्त विद्यापीठ आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

– राहूल पेंढारकर, रंगकर्मी 

 

हे देखील वाचा :-  

Comments are closed.