Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या ‘चांद माथ्यावरी’ या गाण्याची सर्वत्र चर्चा रंगली…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 06 सप्टेंबर :- बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन पुन्हा एकदा आलीय ‘बॉईज ३’ची टीम. ‘मनात शिरली’, ‘मस्त मौला’, ‘लग्नाळू २.०’ ह्या धमाल गाण्यांनंतर आता नुकतेच ‘चांद माथ्यावरी’ हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्तेनी महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक अशी दर्जेदार गाणी दिलेली आहेत. त्यांची गाणी वाजली की टाळ्या, शिट्ट्या वाजल्याच पाहिजे. असाच एक ठेका धरायला लावणार ‘चांद माथ्यावरी’ हे गाणं प्रदर्शित झाले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.

जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा रांगडा आवाज आणि संगीत लाभलेलं आहे. कमाल अश्या हुकस्टेप असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदार यांनी केलेले आहे. सर्व सोशल मिडियावर या गाण्याची चलती पाहायला मिळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात,” प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद मला नेहमीच एक नवी ऊर्जा देतो. ‘चांद माथ्यावरी’ हे प्रमोशनल गाणं सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अशा करतो. ‘बॉईज ३’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकाच मी सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन ‘बॉईज ३’ हा चित्रपट नक्की पाहा.”

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवसेना कुणाची याचा निकाल 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत होणार….

Comments are closed.