अकोल्यात वाढती कोरोना संख्या लक्षात घेता ‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम सुरु
मास्क न लावणाऱ्या १५२ जणांवर कार्यवाही..

अकोला दि १२ फेब्रुवारी: जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असून शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने प्रशासनाने गाभीर्य ओळखून कोविड-१९चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचा काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहिम राबवून शहरातील विविध ठिकाणी भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करुन आवाहन करण्यात आले आहे .
शहरात नागरीक बिना मास्क तसेच निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येताच याला आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी धडक मोहिम राबवून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाही मध्ये १५२ व्यक्तीकडून ३० हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे

.सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून प्रशासन कोरानाचे त्रिसुत्रीय नियमाचे काटेकोर पालन करण्याचे सूचना व आवाहन करीत आहेत आहे .सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून प्रशासन कोरानाचे त्रिसुत्रीय नियमाचे काटेकोर पालन करण्याचे सूचना आवाहन करीत आहेत .
Comments are closed.