गडचिरोली दि १४ जानेवारी :- कोरची तालुक्यात तीन दिवसापूर्वी १३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता पुन्हा ६ विद्यार्थ्यांसह १ कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने पालक धास्तावले आहेत . कोरची तालुक्यातील ४ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी ४ जानेवारीला करण्यात आले होते . त्यांचा अहवाल ११ जानेवारीला प्राप्त झालेल्या कोरची येथील पार्वताबाई विद्यालयातील ५ , श्रीराम विद्यालयातील १ ,शासकीय आश्रमशाळेतील १ आणि बेतकाठी येथील धनंजय स्मृति विद्यालयातील ६ असे एकून १३ विद्यार्थी कोरोना बाधीत आढळून आले होते.
त्यानंतर त्याच दिवशी पार्वताबाई विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यात पुन्हा ६ विद्यार्थी व एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने शिक्षक व पालक वर्गात भीती निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी तालुक्यातील शाळांना भेटी देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याआहेत . यामध्ये शाळा सानिटाइज करणे,शाळा एक आठवडा बंद ठेवणे ,शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची rt-pcr टेस्ट करून घेणे,शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी सूचना त्यांनी दिल्या आहेत.
याशिवाय कोवीड केंद्रालाही भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्य बाबत चौकशी करून तेथे मिळणाऱ्या सोयी सुविधेचा ही माहिती घेण्यात आली आहे .यावेळी गट शिक्षण अधिकारी आबाजी आत्राम मुख्याध्यापक शालिकराम कराडे उपस्थित होते. याविषयी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद मडावी यांना खबरदारी बाबत विचारले असता शाळां सानिटाइज करून आठ दिवस बंद ठेवण्यास सांगितले अशी माहिती देण्यात आली आणि तीच माहिती मुख्याध्यापक शालीकराम कराडे यांना विचारले असता डॉक्टर मडावी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही शिवाय ते कधीही झाले नाही असे सांगितल्यावर नेमके कोण काय करत आहे हा मार्ग कळायला मार्ग नाही .
Comments are closed.