Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात शंभर टक्के कोरोना लसीकरणासाठी “हर घर दस्तक” मोहिम – जिल्हाधिकारी संजय मीना

आरोग्य विभागांतर्गत नाविण्यपूर्ण लसीकरण मोहिमेला २० डिसेंबरपासून सुरूवात. पहिल्या टप्प्यात लसीकरणात मागे असलेल्या सात तालुक्यात होणार मोहिमेला सुरूवात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : गडचिरोली जिल्हयात अनेक गावे, वाड्या दुर्गम आहेत तसेच सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण केंद्रावर पोहचणे शक्य होत नसल्यामुळे आरोग्य विभागाकडून गावोगावी वाड्यावस्तीवर जावून लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे.

प्रधान्याने जिल्ह्यातील पात्र नागरिकांचा पहिला डोस पुर्ण करणे हे या लसीकरणाचा प्रमुख उद्देश आहे. शंभर टक्के लसीकरणातून कोरोना संसर्गापासून होणारे मृत्यू कमी करणे व संक्रमणामूळे होणारे आरोग्य विषयक इतर दुष्पपरिणाम कमी करणे शक्य होणार आहे. यासाठी जिल्हयात नाविण्यपूर्ण अशी “हर घर दस्तक” मोहिम राबवून घरोघरी जावून लसीकरण केले जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे जिल्हयात 508 चमू तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चमूला दर दिवसी गावांचे वाटप करून त्या ठिकाणी लसीकरणाबाबत जणजागृती तसेच प्रत्यक्ष पात्र नागरिकांना लस दिली जाणार आहे. गेल्या काही काळात घरोघरी तसेच शेताच्या बांधावर जावून लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय मीना व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आरोग्य विभागाला सदर अभियान राबवून लसीकरणाला वेग देण्यासाठी सूचना केल्या होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना लसीकरणसाठीची “हर घर दस्तक” ही मोहिम जिल्हयातील सात तालुक्यांमधे २० डिसेंबर पासून २७ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. यासाठी ८३० गावांत पहिला डोस घेणे शिल्लक असलेल्या १.२५ लक्ष नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचा चमू गावातील कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी ताई यांची मदत घेवून लसीकरण मोहिम राबविणार आहेत. सात तालुक्यांमध्ये सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी व धानोरा यांचा समावेश आहे. दर दिवसी मोहिमेच्या कालावधीत वेगवेगळया गावांमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गावातील नागरिकांना घरोघरी जावून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. एक लाखाचा लसीकरणाचा टप्पा या मोहिमेत पुर्ण करण्यासाठी १४२४ लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये धानोरा १२३ मुलचेरा ८१, अहेरी ४४९, भामरागड १०५, सिरोंचा १६५, एटापल्ली ३०८ व चामोर्शी तालुक्यात १९३ लसीकरण सत्रांचा समावेश आहे.

“जिल्हयात शेतीमधील कामे तसेच शेतमजूरी साठी व्यस्त असलेल्या नागरिकांसाठी ही मोहिम उपयोगी आहे. आरोग्य विभागाची टीम दिवसा तसेच आवश्यकतेनुसार रात्रीही लसीकरण करणार आहेत. प्रशासनाच्या या मोहिमेला लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे त्यांना मी आवाहान करतो.”
संजय मीना – जिल्हाधिकारी, गडचिरोली

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लसीकरण सद्यस्थिती 

जिल्ह्यात लसीकरणामध्ये पहिला डोस पात्र नागरिकांपैकी ७८.९१ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. पहिला डोस देण्यामध्ये बाकी असलेली जिल्ह्यात संख्या १,७६,०९० इतकी आहे. त्यामधीलच या मोहिमेत आठ दिवसांमध्ये १.२५ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली जिल्हा निश्चित शंभर टक्के लसीकरणाजवळ पोहचेल अशी शक्यता आहे . आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी संजय मीना यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय जठार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

व्हिडीओ बातमी : 

 

Comments are closed.