Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर

योजना ठरली मातांना लाभदायक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 27 एप्रिल : मातामृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला लॉकडाऊन काळातही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हयातील 34 हजार 316 मातांची प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत नोंदणी झालेली असून मार्च 2022 अखेरपर्यंत मातांच्या बँक खात्यावर 14 कोटी 38 लाख 23 हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या योजनेमुळे महिलांची बँक खाते संख्या वाढली आहे.तसेच बाळाच्या लसीकरणाचे प्रमाण ही वाढले आहे.
संपूर्ण दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गरोदर महिला ज्या आर्थिक दृष्टया कमकुवत असतात अशा मातांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्या पर्यंत व प्रसुती झाल्यावर ही लगेच काहीच काळात दैनंदिन गरजा पुर्ण करण्यासाठी रोजमजुरी करत असतांना अधिक शारीरिक क्षमतेचे काम केल्यामुळे अशा मातांची बालके कमी वजनाची जन्माला येतात व कुपोषणाचे सत्र मातेपासुन बालकापर्यंत रितसर ओढावल्या जाते.

याची दखल घेत शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केलेली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या आधार सिडेडबँक खात्यात तीन टप्प्यांमध्ये 5000/- रुपये अदा केले जातात. या योजनेसाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड,लाभार्थ्यांचे आधार कार्डशी जोडलेले बँक, खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंदणी, बाळाची जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरणाच्या प्रतची आवश्यकता असते. शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील तसेच खाजगी नौकरीतील ज्या मातांना पगारी प्रसुती रजा मंजुर आहे अशा मातांना ही योजना लागु होत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीत आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका-सेवक, आरोग्य सहाय्यिका-सहाय्य हे लाभार्थ्यांना प्रेरित करित असून तालुका कार्यक्रम सहाय्यक,तालुका समुह संघटक,वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीयअधिक्षक, Block Monitor(युनिसेफ), जिल्हा समुह संघटक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक (PMMVY) तालुका आरोग्य अधिकारी अर्ज भरुन घेण्याकरीता प्रयत्न करीत आहेत. जिल्हास्तरावरुन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ.समिर बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली, डॉ.दावल साळवे वेळोवेळी पाठपुरावा करीत असतात.

डॉ.अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी पहिल्या खेपेच्या मातांना शासनाकडून मिळालेले वरदान हया स्वरुपात असुन जिल्हयातील माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास योजना कारणीभुत ठरले असे सुचविलेले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पहिल्या खेपेच्या मातांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान कु.अश्विनी मेंढे, जिल्हयाचे प्रधानमंत्री मातृ वंदना,जिल्हा कार्यक्रम समन्वयक,गडचिरोली यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हयातील सर्व पात्र गरोदर माता प्रधानमंत्री मातृ वंदना योजने पासुन वंचित राहु नये,यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील राहील असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली कुमार आर्शीवाद,यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सक्षम-2022 संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन

 

Comments are closed.