Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलिसांकडून रक्तदान शिबीर व महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १२ नोव्हेंबर : राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची सामाजिक बांधिलकी वाढावी, तसेच जनता व पोलीस दल यांचेमध्ये सलोखा वृंदिगत व्हावा. याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये
मा. समादेशक विवेक मासाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा ता. वडसा
जि. गडचिरोली येथे पोलीस अधिकारी / पोलीस अमंलदार, लिपीक कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय
यांच्याकरीता जिल्हा रक्तपेढी गडचिरोली, ग्रामिण रुग्णालय वडसा व प्राथमिक आरोग्य केन्द्र सांवगी यांच्या संयुक्त
विद्यमाने रक्तदान शिबिर व विना शुल्क महीलांचे आरोग्य तपासणी तसेच पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे करीता
रक्त चाचणी शिबिराचे आयोजन दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील गरीब व गरजू आजारी रुग्णांना वेळेवर रक्ताची गरज भासल्यास जिल्हा सामान्य.रूग्णालय येथे तात्काळ उपलब्ध याकरीता गटा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिरामध्ये ८६ पोलीस अमंलदार यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला. तसेच Complete Hemogram, Lipid
Profile, Kidney Function Test, Liver Function Test, Calcium Total, Vatamine D Tatal, Thyroid
Profile Total & TSH, HbA1c, Blood Gloocose Fasting, Sodium Serum, Potassium Serum सारख्या
पोलीस अधिकारी अमंलदार, लिपीक कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व कुटूंबिंयाची विनाशुल्क रक्त चाचण्या करण्यात
आल्या आहेत. तसेच शासकिय निवास्थानातील ७१ महीलांची “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या योजने अंतर्गत विनाशुल्क वैद्यकिय आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर शिबिरामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथील गटाचे मा. समादेशक सहाय्यक  डी. एस. जांभूळकर, पो. नि. एस. एन. गाडेकर, पो.नि. पी. डी. एकोणकर, पोउपनि/ एन. आर. फणसे, पोउपनि/एस. डी. तितिरमारे, पोउपनि/सी. एच. धनविज व पोलीस अमंलदार, लिपीक वर्गीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व शासकिय निवास स्थानातील पोलीस कुटूंबियांनी यांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला.

भविष्यातही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, वडसा जि. गडचिरोली येथे पोलीस अधिकारी, अंमलदार, कुटंबियांचे तसेच आजू बाजूच्या गावामधील जनतेसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबत रारापोबल गट क्र. १३ चे समादेशक सहाय्यक दशरथ एस. जांभुळकर यांनी सांगीतले.

हे देखील वाचा : 

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

जितेंद्र आव्हाड हे छत्रपतींच्या अपमान करणार्‍यांना जाब विचारल्याने जेलमध्ये जात असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे- खा.सुप्रियाताई सुळे

 

Comments are closed.