जिल्हा महिला रुग्णालयात कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना न्याय द्या
शेतकरी कामगार पक्षाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी
अचानक कामावरून काढून टाकल्याने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड
गडचिरोली १८ डिसेंबर: गडचिरोली येथील जिल्हा महिला रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून कार्यरत अकुशल रोजंदार कर्मचाऱ्यांना आज अचानक कामावरून काढून टाकण्यात आले असून या रोजंदार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने त्यांनाच कामावर कायम ठेवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गडचिरोली येथील महिला रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून २९ रोजंदार कर्मचारी कार्यरत होते.आज अचानक त्याऐवजी औरंगाबाद येथील मे.ॲक्युरेस सर्वीसेस इंडिया,प्रा.लि.यांना कुशल व अकुशल रोजंदार कामगार पुरवठ्यासाठी आदेश देण्यात आल्याने सदर कंपनीच्या कामगारांना रुग्णालयात रुजू करण्यात आले. तर जुन्या कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला.
या प्रकरणामुळे आज अचानक मागील तीन वर्षांपासून कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झालेला असून दवाखान्यातही, नव्याने नियुक्त रोजंदारांना अनुभवाचा अभाव लक्षात घेता रुग्णालयात गैरसोयीचा प्रश्न निर्माण होवू शकतो.असेही भाई रामदास जराते यांनी आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच आपण वैक्तीश: लक्ष घालून मे.ॲक्युरेससर्वीसेस इंडिया,प्रा.लि.औरंगाबाद यांना मनुष्यबळ पुरवठ्यासाठी दिलेला आदेश तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत.तसेच जुन्याच पद्धतीने मागील तीन वर्षांपासून कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना कामावर सामावून घेवून दिलासा देण्यात यावा अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर,भाई सुनील कारेते, ॲड.कबीर कालीदास, ॲड.प्रियंका बांबोळे, योगेश गोहणे,मुख्तार पठाण,किरण लोनबले, मुकुंदा कुंभारे, संजय मेश्राम,शरद बोरकर, जतिन शिंपी, अरविंद डोंगरे, राजकुमार डोंगरे,समीर पदा, विशाल डोमळे, मुकेश मुन्घाटे, संजय गोरडवार, प्रफुल्ल बांबोळे, शालिनी चंद्रगिरे, ज्योती कावळे, योगिता भोयर, कुंदा नाचनकर, संगिता मंडलवार, वैशाली सालोटकर,उत्तरा बारसागडे, भुमिका कांबळे,शगुफ्ता बेग,निशा पेंदाम, जुबेर पठाण, सिध्दार्थ बाबनवाडे,कल्याणी सुरपाम,वर्षा ठेवले,धनविता मेश्राम, माधुरी राऊत,प्रमोद वेस्कडे, महेंद्र लटारे,प्रीतम गोहणे या अन्यायग्रस्तांनी मागणी केली आहे.
Comments are closed.