Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उच्च कोलेस्ट्राॅलमुळे वाढतो आजारांचा धोका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आजच्या व्यस्त जीवनात आरोग्याची काळजी घेणे खुप कठीण आहे. वृध्दांबरोबरच तरूणांमध्येही अनेक आजार दिसून येत आहेत. त्यापैकी बहुतेक तरूण व वृध्द उच्च कोलेस्ट्राॅलच्या समस्येने ग्रस्त आहेत. निरोगी पेशी तयार करण्यासाठी कोलेस्ट्राॅल आवश्यक असले तरी शरीरात त्याचे प्रमाण जास्त असल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. यासोबतच ब्लडप्रेशर, लठ्ठपणाशी संबंधित समस्या ही निर्माण होतात. या सर्व समस्यांमध्ये कोलेस्ट्राॅलची वाढती पातळी महत्वाचे कारण आहे. चरबीयुक्त अन्न खाणे, व्यायाम न करणे, वजन जास्त असणे, धुम्रपान करणे आणि काही वेळा ते अनुवांशिक देखील असते. शरीरातील कोलेस्ट्राॅल वाढण्याची चिन्हें दिसत नसली तरी त्यामुळे अनेक गंभीर आजार होउ शकतात.

कोलेस्ट्राॅल एक चरबी आहे, जी यकृताद्वारे तयार केली जाते. शरीराच्या योग्य कार्यासाठी हे खुप महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जगण्यासाठी भरपूर कोलेस्ट्राॅलची गरज असतेत्र कोलेस्ट्राॅल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो रक्ताच्या प्लाझमाद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचतो. परंतु जर ते आवश्कते पेक्षा जास्त जमा होउ लागले तर ती गंभीर समस्या बनते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उच्च रक्तदाब हा आजच्या युगात एक सामान्य आजार झाला आहे. कोलेस्ट्राॅल वाढल्यामुळे आपल्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे रक्त पोहोचणे खुप कठीण होते. ज्याचा परिणाम हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक सारखी स्थिती असू शकते. कोलेस्ट्राॅलच्या उच्च पातळीमुळे रक्तपेशी कमी होउ लागतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यां मधील रक्त प्रवाह बराच कमी होतो. जेव्हा हे कोलेस्ट्राॅल तुटते तेव्हा ते गोठण्याची समस्या निर्माण करते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होउ शकतात.

शरीरातील कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणाबाहेर राहिल्यास ब्रेन स्ट्रोक देखील होउ शकतो. खरं तर, कोलेस्ट्राॅल वाढल्यामुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होत नाही, त्यामुळे पक्षाघात होण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढले की पाय दुखण्याची समस्या होउ शकते. यामुळे तुमचे पाय पूर्णपणे सुन्न होउ शकतात. तुम्हाला सतत थकवा जाणवतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जर तुम्ही असा आहार घेतला ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असेल तर रक्तातील एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढते. मांस, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, खोबरेल तेल, पाम तेल, लोणी, चाॅकलेट, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि बेकरी उत्पादने कोलेस्ट्राॅल वाढवू शकतात. त्यामुळे या गोष्टी टाकून तुम्ही स्वतला खराब कोलेस्ट्राॅलपासून दूर ठेवू शकता.

हे पण वाचा :-

Comments are closed.