Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराविरोधात किसान सभेचे तळेघर येथे बेमुदत धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

प्रतीनिधी :- सागर कपें
पुणे दि .२० जानेवारी :- आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे रोजी रोटी करणार्या आदिवासी बांधवांना जिवास मुकावे लागले आहे . याची  वेळीच उपचारासाठी दखल न घेतल्यास आणखी काही मजुराना जीवास मुकावे लागणार असल्याचे आरोप तलेघर येथिल मजदूर वर्गानी केला आहे .

कोरोना प्रादुर्भावाने आधीच काम धंदे नाही आणि यातच प्रकुर्ती मध्ये बिघाड निर्माण झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर नीट उपचार मिळत नसल्याने कामगार बांधवाना कित्येकदा खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत . दोन दिवसा आधी दि.१९ जानेवारी ला तळेघर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात  रात्री साडे दहा च्या सुमारास अचानक  एक गंभीर रुग्णाला नेले असता वेळेवर  डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णावर उपचार करण्यास दिरंगाई झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नुकतेच फलोदे गावातील गरोदर महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते असता  डॉक्टर रुग्णालयात नसल्याने उपचाराभावी सदर महिलेसह बाळासजिवानिशी मुकावे लागले . या आधी ही श्रीमती लोहकरे यांनाही वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना ही प्राण गमवावे लागला . या भागात अनेक वेळा सर्पदंश झालेले रुग्ण येऊनही त्यांच्यावर उपचार न करता त्यांना घोड़ेगाव येथे पाठवले जाते .या पार्श्वभूमीवर किसान सभेने दि.३१/१२/२०२०  रोजी आंदोलन पुकारले होते,परंतु तालुका आरोग्य अधिकारी व सहाययक गट विकास अधिकरी यांनी लेखी निवेदन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. लेखी निवेदन देऊनही नवीन डॉक्टर उपलब्ध होत नाही व डॉक्टर निवासी थांबत नसल्याने  रुग्णावर योग्य वेळेत उपचार मिळत  नसल्याने  निवासी डॉक्टर असावेत या मागणीसाठी  किसान सभेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे .


तळेघर येथे मूळ नियुक्तीस असलेले डॉ.उभे यांना त्यांच्या मूळ जागी आणावे.
डॉ बिरारी हे दोन मृत्यूस जबाबदार आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे. डॉ बिरारी यांच्या विविध तक्रारी मांडुनही त्यांची साधी बदली ही न करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी. वरील मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर सुरू असून या मागण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संघटना बेमुदत धरणे आंदोलनाचे रूपांतर उपोषणात होईल असा ईशारा देण्यात आला आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.