Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्च रुग्णालयात ०७ डिसेंबरला वेदना व्यवस्थापन व पोटविकार ओपीडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील डॉक्टर  अभय व राणी बंग यांचे चातगाव स्थित माँ दंन्तेश्वरी  ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना व्यवस्थापन ओपीडी सुरु झाली करण्यात आली आहे. सदर ओपीडी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी  असते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दि. ०७ डिसेंबर २०२४  रोज शनिवारला सर्च रुग्णालयात वेदना व्यवस्थापन ओपीडी  असून, डॉ. जितेंद्र जैन व सहकारी डॉक्टरांची टीम हे तपासणी करणार आहेत.  गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीस  रुग्णांचा प्रतिसाद बघता चातगाव  येथील माँ दंन्तेश्वरी रुग्णालयात ही वेदना व्यवस्थापन ओपिडी आयोजित केली. या ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे ,पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्‍या वेदना,कर्करोग आजारांमुळे होणार्‍या तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना या सर्वांवर उपचार होईल.

हे ही वाचा,

 

 

Comments are closed.