धक्कादायक – पोलिओची लस देताना चिमुकल्याच्या पोटात गेला पोलिओ डोस सोबत नोझल कॅप
सोलापूर दि ०२ फेब्रुवारी :- पंढरपुर तालुक्यातील भाळवणी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा सूक्ष्म तुकडा गेल्याची घटना समोर आली आहे . प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी येथील पोलिओ लसीकरणा दरम्यान हा प्रकार घडला आहे.

या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे लसीकरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे . या बाळाचे बालरोगतज्ज्ञ कडे उपचार करून एक्स रे स्कनिंग करण्यात आले असून बाळाला कोणताही धोका नाही अशी माहिती वैद्यकीय अधिकारी अभिजित रेपाळ यांनी दिली असली तरी आरोग्य विभागातील कर्मचारी किती दक्ष आहेत हे या घनेवरून लक्षात येते .
Comments are closed.