Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्मोकिंगमुळे व्यक्तीच्या शरीराबरोबरच मेंदूवर देखील होतो परिणाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, ४ जानेवारी : अमेरिकेतील रोचेस्टर मेडिकल सेंटर विश्वविद्यालयातील (URMC) संशोधनात सिगारेटचा मेंदूवर नेमका काय परिमाम होतो हे समोर आलं. जर्नल टोबॅको इंड्स्यूड डिजीस अँड प्लस वन या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

धूम्रपानामुळे  डोक्यापासून ते पायांपर्यंत संपूर्ण शरीराला परिणाम भोगावे लागतात. सिगारेट आणि सिगारेटच्या धुरामध्ये अधिक घातक रासायनिक घटक असतात. यामुळे व्यक्तीच्या शरीराबरोबरच मेंदूवर देखील परिणाम होतो. नवीन संशोधनात तर  फुफ्फुसाप्रमाणेच मेंदूत धूर साठत असल्याचं समोर आलं आहे. हा धूर म्हणजे एकप्रकारचा मेंटल फॉग ज्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

14 वर्षे वयापासून मुलांनी धूम्रपान करण्यास सुरुवात केल्यास त्यांच्या मेंदूत एक प्रकारचा धूर साठतो. हा धूर त्यांच्या मेंदूवर दीर्घकाळ परिणाम करणारा असून यामुळं स्मृतिभ्रंश होतो, निर्णय प्रक्रियेवर याचा परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत.

या संशोधनाच्या सहयोगी आणि यूआरएमसी येथील क्लिनिकल अँड ट्रान्सलेशनल सायन्स संस्थेच्या प्राध्यापिका डोंगमेई ली यांनी सांगितलं, “तंबाखूचे कोणत्याही प्रकारे सेवन केल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. यामध्ये तुम्ही तंबाखू खाल्ल्याने असो किंवा सिगारेटच्या रूपात असो. सर्व पद्धतींनी याचा मेंदूवर परिणाम होतो. त्याचबरोबर ई -सिगारेटमध्ये देखील तंबाखूचे प्रमाण तितकंच असल्यानं त्याचा देखील मेंदूवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. हा परिणाम विशिष्ट वयोगटावर होतो असं नाही तर सर्व वयोगटावर याचा परिणाम होत असून लहानपणीच धूम्रपान केल्यानं खूप अवघड परिणाम होतो.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्मोकिंगमुळे मेंदूवर होतो परिणाम

लहान वयातच सिगारेटचे व्यसन लागल्यास मेंदूवर याचा खूप परिणाम होतो. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, मेंदूची वाढ नीट होत नाही. स्मृतिभ्रंश आणि निर्णय प्रक्रियेवर याचा परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. याचा दीर्घ परिणाम होऊन मेंदूवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. याचबरोबर याचे भयंकर परिणाम होत असून धूम्रपान टाळण्याचा प्रयत्न करावा”.

Comments are closed.