चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजणार्या त्या तिघांचे निलंबन
यवतमाळ, दि. 2 फेब्रुवारी:- घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा दरम्यान कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतल्याचे उघड झाल्याने या प्रकरणी केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केले आहे.
बारा लहान मुलांना मळमळीचा त्रास सुरू झाला. यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रात्री उशिरा उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात धाव घेत मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत.
रुग्णालयात मुलांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. पोलिओ बुथवरील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने सर्व बालकांना परत बोलावून त्यांना पोलिओ डोस पाजला. ही घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली गेली नव्हती.
Comments are closed.