Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी एकूण ५९४ जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ जानेवारीपासून ESIC (Employee State Insurance Corporation) च्या www.esic.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२२ असणार आहे.

एकूण जागा :  ५९४

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव आणि तपशील : 

पद क्र.

पदाचे नाव पद संख्या

उच्च श्रेणी लिपिक (UDC)

३१८

स्टेनोग्राफर

१८

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

२५८

एकूण

५९४

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  पदाचे नाव :

१. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC)

२. लघुलेखक स्टेनो (Stenographer)

३. मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff)

 शैक्षणिक पात्रता :

१. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

२. लघुलेखक स्टेनो (Stenographer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

३. मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :   

 UDC आणि स्‍टेनो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ फेब्रुवारी २०२२ रोजी  १८ ते २७ वर्ष या दरम्यान असावे.

MTS या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ फेब्रुवारी २०२२ रोजी  १८ ते २५  वर्ष या दरम्यान असावे.

[SC/ST प्रवर्गाच्या उमेवारांकरिता  ५ वर्षे तर OBC प्रवर्गाच्या उमेवारांकरिता ३ वर्षे शिथिलक्षम सूट देण्यात आली आहे]

नोकरी ठिकाण :  संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क :  General/OBCप्रवर्गाच्या उमेवारांकडून ५००/- रुपये

तर SC/ST/PWD/ExSM/महिला प्रवार्गाकडून २५०/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार.

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार.

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

संपूर्ण जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

हे देखील वाचा  : 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

 

 

Comments are closed.