Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

1 लाख 80 हजारांचा गुळाचा सडवा नष्ट

बामणी पोलिस व मुक्तीपथची कृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिरोंचा, 10 जून – सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील विक्रेत्यांचा 1 लाख 80 हजार 500 रुपये किंमतीचा गुळाचा सडवा नष्ट केल्याची कृती बामणी उप पोलिस स्टेशन व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. या कारवाईमुळे परिसरातील इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

गर्कापेठा येथे नव्याने दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना वारंवार सूचना करून अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना देण्यात आली. तरीसुद्धा काही विक्रेते चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत होते. अशातच हातभट्टी लावून दारू गाळण्यासाठी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथक व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत दारू विक्रेत्यांचा 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा 18 ड्रम गुळाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कारवाई केली. या मोहिमेत बामणी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पारधी, पोलिस कर्मचारी व मुक्तीपथ तालुका चमुचा सहभाग होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.