गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल भागातील वर्ग 5 ते 8 वीची 1072 शाळा सुरू
गडचिरोली, दि. २७ जानेवारी: राज्य शासनानी आज पासून राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी आदेश दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल भागातील शाळेमध्ये मोठ्या उत्साहात वर्ग 5 ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु झाले आहे. ९ महिन्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील मोठ्या शहरामध्ये विद्यार्थी पालकांत कोरोनाची भीती असल्याने आजही शाळेत विद्यार्थी पाठविण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहेत. मात्र गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालक उत्सुक आहेत. गडचिरोली जिल्ह्याला दुर्गम आदिवासी बहुल म्हणून ओळख असली तरी शिक्षणासाठी किती धावपळ करतात हे आज सकाळी विद्यार्थी मोठ्या उत्साहात शाळेत दाखल होण्यासाठी दुर्गम भागातून बसने आणि सायकलने हजर झाल्याने स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 1072 शाळा असून ऐकुन विदयार्थि संख्या 58158 आहेत त्यापैकी शाळेच्या पहिल्या दिवशी 38122, विद्यार्थी उपस्थिती ची नोंद करण्यात आली आहे. शालेमाधिल विद्यार्थ्याची तापमान मोजल्यानतर मास्क घालून शाळेत घेतले जाईल. राजकुमार निकम शिक्षणाधिकारी गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात असलेल्या आलापल्ली येथील धर्मराव हायस्कूल शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यानंतर शाळेच्या मैदानावर कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून काळजी घेण्याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची शाळेच्या मैदानावरच थर्मल स्कॅनिंग, सॅनीटायझरने हात स्वच्छ करण्यात आले आणि मास्क घालूनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. याशिवाय वर्गाच्या आत सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे पालन करीत शाळेतील एका बेंच वर एकच विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.