Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माळशेज घाटात बिबट्याच्या हल्ल्यात १२ बकऱ्या ठार…

नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

टोकावडे प्रतिनिधी, दि.१ जून.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुरबाडधील माळशेज घाटाच्या पायथ्याशी बिबट्याने  हल्ला करून १२ बकऱ्यांचा बळी घेतला आहे.  सावरणे कोंभलपाडा येथील चीमा श्रावण कोंढावले या आदिवासी बांधवाच्या मालकीच्या या बकऱ्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून या बकऱ्या बेपत्ता होत्या. आज सकाळी जंगलात मृतावस्थेत ह्या  बकऱ्या आढळल्या. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिशय नयनरम्य अशा माळशेज घाटात पर्यटनासाठी सध्या मोठी गर्दी होताना पहायल मिळते आहे. परंतु तुम्ही माळशेज घाटात फिरायला जाणार असाल तर जरा सांभाळून.कारण या घाटाच्या पायथ्याशी बिबट्याने तब्बल   १२ बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. सावरणे कोंभलपाडा येथील चीमा श्रावण कोंढावले या आदिवासी बांधवाचा बकऱ्या पालन करून उदरनिर्वाह चालतो. मात्र १२ ठार झाल्यामुळे  आता जगायचे कसे असा प्रश्न चीमा कोंढावले याला पडला आहे. तीन दिवसांपूर्वी जंगलात चाररण्यासाठी नेल्या होत्या, परंतु संध्याकाळ झाली तरी कळपातील १२ बकऱ्या परत आल्याचं नव्हत्या. दोन दिवस या बकऱ्यांचा शोध सुरु होता, परंतु आज सकाळी या बकऱ्या जंगलात मृतावस्थेतय आढळून आल्या, बिबट्याने केलेल्या  हल्ल्यात या सर्व बकऱ्या ठार झाल्याची  प्रत्यक्ष दर्शी समजिक कार्यकर्ते गोविंद कारभल यांनी लोक स्पर्श न्युज सोबत बोलातना दिली. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन पीडित आदिवासी बांधवाला तातडीने मदत करावी अशी मागणी देखील समजिक कार्यकर्ते गोविंद कारभल यांनी केली आहे.

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.