Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू – जिल्हाधिकारी दिपक सिंगला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांचेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच दिनांक २ एप्रिल २०२१ रोजी गुड फ्रायडे, दि. १३ एप्रिल २०२१ रोजी गुडी पाडवा तसेच १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरीक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक १ एप्रिल पासून ते १५ एप्रिल च्या मध्य रात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) लागु  करण्यात आलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे.

शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यांस धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, ५ इसम किंवा त्यापेक्षा जास्त  इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर त्या दरम्यान जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. सदर आदेश संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.