Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा

लाखांदूर तालुक्यातील घटना, विषबाधे मध्ये लहान मुलांचा समावेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा 3 डिसेंबर :-  लग्न स्वागत सोहळ्यात पाहुणे मंडळींना दिलेल्या अन्नातून सुमारे २०० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्या अंतर्गत येत सरांडी बुजरूक येथे उघडकीस आला आहे तर झालेल्या विषबाधे मध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रात्री भोजन केल्यानंतर काहींना सकाळी त्रास व्हायला लागला. तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला. रुग्णांना खासगी रुग्णालयासह सरांडी बूजरूक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून सर्वंची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

अधिक दक्षता म्हणून आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे. तर सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुलाचां विवाह पार पडला होता त्यांनतर दुसऱ्या दिवशी सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडी सह नजीकच्या गावातील पाहुण्यांनी हजेरी लावली. मात्र सकाळी त्रास जाणवू लागल्यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी डॉक्टर कडे धाव घेतली यावेळी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तसेच बाधित रुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबविणल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तर ही घटना उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. अन्नाचे व तेलाचे नमुने सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत. आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.