Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोलच्या संस्थेच्या वतीने तोडसा येथील आरोग्य शिबिराचा 240 रुग्णांनी घेतला लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 6 ऑगस्ट :-  

एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथिल आश्रमशाळेत सर्वरोग निदान व उपचार शिबीर रोल संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी परिसरातील 240 रुग्णांनी लाभ घेतला.आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या सहकार्याने, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, मेडिसीन तज्ञ, त्वचारोग तज्ञ, श्वसन रोग तज्ञ डॉक्टरांनी रुगणांची तपासनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


रोगाचे निदान करून औषधी देण्यात आली आणि 24 रुग्णांना ऑपरेशन साठी सावंगी ला नेण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये गावचे गावकरी व तसेच शालेय विद्यार्थी या सर्वांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली. या शिबीराचे उद्घाटन तोडसा चे सरपंच प्रशांत आत्राम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संस्थेचे सचिव डॉ. डंबोळे, डॉ. सिगने सावंगी, प्रदीप जी देशमुख, दलसु हितलामी, रामेश्वर चिपीये गावातील लोकांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार

Comments are closed.