Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या; हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी – कृषीमंत्री दादाजी भुसे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क       

मुंबई डेस्क, दि. 24 जून : राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सुन क्षीण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमीनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दिनांक 22 जून 2021च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पूर्वीच कृषी विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला होता. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जूनपर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या.

हे देखील वाचा  :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजना

चंद्रपूर येथे 28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.