शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 जणांचे अर्ज वैध.
उमेदवारांकडून एकूण 65 अर्ज दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, दि. 13 नोव्हेंबर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरविण्यात आले आहे. या 28 उमेदवारांनी एकूण 65 अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिली. या छाननीवेळी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये उपस्थित होते.
या निवडणुकीत छाननीनंतर अंतिमत: डॉ. नितीन रामदास धांडे (भारतीय जनता पक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे(अपक्ष), विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष) हे 28 उमेदवार राहणार आहेत.
या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांनी 65 नामनिर्देशनपत्र दाखल केले. यापैकी संगिता शिंदे-बोंडे यांनर दाखल केलेल्या चार पैकी एक अर्ज नामंजूर करण्यात आला. उर्वरीत तीन अर्ज मंजूर करण्यात आल्याने त्यांनी उमेदवारी कायम आहे. उर्वरीत 64 अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.
Comments are closed.