रायगड किल्ल्यावर सापडली ३५० वर्षांपुर्वींची सोन्याची बांगडी आणि निरांजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड, दि. ३ एप्रिल: रायगड किल्यावर सुरु असलेल्या उत्खनन कामात आज एक सोन्याची बांगडी आणि निरंजन सापडले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात साबुत स्थितीत सापडलेला स्त्रीयांचा हा पहिला अलंकार आहे.

जगदीश्वर मंदीरा शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये या वस्तु सापडल्या आहेत. रायगडावर ३५० ठिकाणी उत्खनन होणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाच्या उत्खननाच्या गतीने ३५० ठिकाणचे उत्खनन होण्यासाठी खुप वेळ लागणार आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाच्या स्पेशल सेलला उत्खननाची परवानगी द्यावी अशी मागणी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज छ. संभाजी राजे यांनी केली आहे.
Comments are closed.