Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भरधाव स्कारपीओ वाहनाने ४ वर्षीय चीमुकल्यास चिरडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ३ जून: बऱ्याच प्रतीक्षेनंतर जन्माला आलेल्या व अंगाखांद्यावर खेळणाऱ्या एकुलता एक असलेल्या चार वर्षीय चिमुकल्यास स्कारपीओ वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना आरमोरी तालुक्यातील वडधा येथे बुधवारी रात्रौ १० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात घटनास्थळी मृत पावलेल्या बालकाचे नाव श्रवण सुधीर कुर्वे रा. वडधा असे आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरमोरी तालुक्यातील वडधा येथील चार वर्षीय बालक श्रवन सुधीर कुर्वे हा बुधवार दि. २ जून  ला रात्रौ नेहमीप्रमाणे आपल्या काकासोबत झोपण्यासाठी गेला होता काकाला लघवी (लघुशंका) लागली म्हणून खाटेवर मुलाला झोपून राहण्यास सांगितले असता, तो चिमुकला पण काकांच्या मागे उठून लघवी  करण्यासाठी गेला. रोडालगतं घर असल्याने रोडच्या कडेला उभा असताना वडधा बसस्थानक कडून  भरधाव वेगाने डार्लीकडे जाणाऱ्या एम.एच. ०६ .बि. ई. ४०७३ या क्रमांकाच्या पांढऱ्या स्कारपीओ  वाहनाने चिमुकल्या बालकाला धडक देऊन चिरडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अपघातात चिमुकल्या श्रवण चा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी सदर वाहन चालकाने वडधा येथील पहिल्या चौकात सुध्दा अपघाताचा वार चुकविला आणि त्याने नंतर लहानग्या श्रवणला धडक देऊन घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला याप्रकरणी वाहन चालक शुभम सहारे रा. डार्ली यांचा विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.

लहानग्या श्रवणचे शवविच्छेदन झाल्यावर शोकाकुल वातावरणात त्या चिमुकल्यावर वडधा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वडधा येथील सुधीर कुर्वे व रागिणी कुर्वे या दाम्पत्याला विवाहानंतर बऱ्याच कालखंडानंतर श्रवण जन्माला आला होता. श्रवण चे वडील अतिशय गरीब असून भूमिहीन असल्याने टेलरिंग चे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. एकुलता एक असल्याने आई, वडील काका, आजी या सर्वाचा लाडका होता. त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याने व अंगणात बागळण्याने घर कसे आनंदित व्हायचे. परंतु हा आनंद जास्त काळ टिकून राहिला नाही.  बुधवारच्या त्या काळरात्रींने लाडक्या श्रवण का त्यांच्यातून हिरावून घेतले आणि सुधीर कुर्वे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांच्या जगण्याचा आधार हरपला.

हे देखील वाचा :

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील हटणार लॉकडाऊन : मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

गडचिरोली जिल्ह्यात म्यूकर मायकोसिस च्या 7 रूग्णांचे निदान

 

Comments are closed.