Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूरात घोडाझरी तलावात पर्यटनासाठी गेलेल्या ५ तरुणांचा बुडून मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : जिल्ह्यात नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी तलाव या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या ५ तरुणांचा आज तलावात बुडून मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातल्या साठगाव कोलारीचे रहिवाशी जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे हे एकाच कुटुंबातील चार जण होते, तर तेजस ठाकरे त्यांचा मित्र होता. बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ गावंडे कुटुंबातले आहेत.

तरुणांनी घोडासरी तलावाचा पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सहा जण या तलावात पोहोण्यासाठी उतरले असताना, तलावाच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला, तर हिंगोलीचा आर्यन हेमराज हा केवळ बचावला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या तरुणांना बाहेर काढलं. तर एकाच गावातल्या पाच तरुणांचा मृत्यू झाल्यानं तर गावंडे कुटुंबातल्या चार मुलांचा मृत्यू झाल्यानं गावावर आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments are closed.