मोठा अपघात:भिषण अपघातात ६ जण ठार,मृतांचा आकडा वाढण्याची भीती,तोरणमाळ खडकी घाटात झाली घटना
नंदुरबार, दि. २३ जानेवारी : धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप मोठ्या दरीत कोसळली. या अपघातात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या जीपमध्ये आणखी मजूर असण्याचे वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या अपघातातील जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जीप मोठ्या दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असतांना हा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भौगोलिकदृष्ट्या हा परिसर अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे अपघातस्थळी मदत कार्य करण्यास अडचण निर्माण होत आहे.
Comments are closed.