Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 79 प्रलंबित आणि 220 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.07  मे : भारत देशातील संपुर्ण न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात दिनांक 07 मे 2022 रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 79 प्रलंबित आणि 220 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि रुपये 1,63,82,433/- वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या मामल्यांकरीता स्पशेल ड्रायव्हरद्वारे एकूण 12 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यु.बी. शुक्ल व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, डी.डी. फुलझेले यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.एम. मुधोळकर यांनी पॅनल क्र.01 वर काम पाहिले, पॅनल क्र.02 वर दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली एम. आर. वाशिमकर तर पॅनल क्रं. 03 वर सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.), गडचिरोली, आर.आर.खामतकर यांनी काम पाहिले. तसेच पॅनल क्रमांक 01 मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता, गडचिरोली किशोर एस. आखाडे आणि विधी स्वयंसेवक गौतम जी. डांगे, पॅनल क्रमांक 02 मध्ये पॅनल सदस्य म्हणून पॅनल अधिवक्ता ए.बी. रणदिवे आणि विधी स्वयंसेवक दिनेश बि. बोरकुटे, पॅनल क्रमांक 03 मध्ये पॅनल सदस्य म्हणून पॅनल अधिवक्ता योगेश एम. निमगडे आणि विधी स्वयंसेवक नरेंद्र डी. मोटघरे यांनी काम केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार माडीया सांस्कृतिक महोत्सव 2022 चे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ‘आयआयएम’ सोहळ्यासाठी आज नागपूरात आगमन

आयआयएम नागपूर कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते 8 मे रोजी होणार उदघाटन नागपूर

 

 

Comments are closed.