‘असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया’ गडचिरोली तर्फे सामाजिक दायित्व जोपासत ८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
१२ विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वाटप. ‘असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया’ ग्रुपचा उपक्रम.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. ३० नोव्हेंबर: ‘असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया’ ग्रुप गडचिरोली च्या वतीने वनविश्रामगृह गडचिरोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामुळे विविध आजारासाठी नागरिक आरोग्य विभागात उपचार घेण्यासाठी वेळेवर भीतीपोटी जात नसल्याने सध्या रोग्यांची संख्येत वाढ झाली आहे. रोज विविध आजाराने ग्रासले असल्याने व औषधोपचार वेळेवर घेत नसल्याने अशक्तपणा आल्यावरच रुग्णालयात नागरिक जात असतात. त्यावेळी जिल्हाभरातील रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांना रक्ताची चनचन भासू लागली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला वेळेवर उपचारासाठी रक्ताची कमी जाऊ नये यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यासह रक्तदात्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ‘असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया’ ग्रुप मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय संस्थेमार्फत प्राविण्यपूर्ण गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती १२ विद्यार्थाना प्रत्येकी ६००० शिष्यवृत्ती देण्यात आली.
या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष व सामाजिक वनीकरण नागपूरचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, सामाजिक वनीकरण गडचिरोलीचे विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले, गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके तसेच केंद्रीय वनमजुर वनकर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर सोनटक्के आदी सदस्यांची उपस्थित होती. रक्तदात्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच शिष्यवृती वितरण समारंभात एकूण 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ६००० प्रमाणे ७२ हजार रक्कमेचे शिष्यवृती चे धनादेश वितरित करण्यात आले.
या वितरण समारंभांप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी असोसिएशनच्या निर्मितीबाबतची भूमिका आणि आतापर्यंत गडचिरोली युनिटने गरजूंसाठी राबविलेल्या अन्नधान्य वाटप कपडे शालेय साहित्य व रक्तदान शिबिराचे आयोजन अशा विविध उपक्रमांवर उपस्थिती विद्यार्थ्यासमोर प्रकाश टाकला. तर अध्यक्षस्थानावरून डॉ. मानकर यांनी असोसिएशनची मूळ निर्मिती उदभवलेल्या परिस्थितीचे उदाहरण देऊन संघटनेचे उद्देश व सभासदांकडून मिळणारे तन, मन, धनानिशी असणारे मोलाचे सहकार्य विषद करून उपस्थित विद्यार्थांना भविष्यात विविध क्षेत्रात उच्चांक गाठण्याबाबत शुभेच्छा देत पुढे सहकार्याची भावना जोपासण्याचे आवाहन केले. संचालन सी. जे. ब्राम्हणवाडे तर आभार सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरूप कन्नमवार, महेंद्र गावंडे, रुपेश मेश्राम, कमलेश मगर, भारत अलीवार, उमेश बोरावार, धर्मराव दुर्गामवार, राजू कोडाप, नितेश सोमनकर, किशोर सोनटक्के, मनोज पिपरे, नितीन हेमके, कुणाल निमगडे, अजय कुक्कुडकर यांच्यासह सभासद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments are closed.