सर्जरीतील चुका टाळण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये होणार कॅडेवर लॅब.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर दि. ६ डिसेंबर : सर्जरीतील त्रुट्या व चुकांना टाळण्यासाठी व सर्जरीचे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने मेडिकल कॉलेजमध्ये कॅडेवर लॅब निर्माण करण्यात येत आहे. आगामी दीड महिन्यात ही लॅब निर्माण होणार आहे. मेडिकलमध्ये अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी कॅडेवर लॅब बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
या लॅब निर्मिती शरीररचना शास्त्र विभाग, शल्य चिकित्सा विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) विभागाच्या संयुक्त उपक्रमात होत आहे. यात जे शव मेडिकलला मिळेल ते या लॅबमध्ये ठेवण्यात येतील. याकरिता विशेष प्रकारचा शीतकक्ष तयार करण्यात येणार आहे.
एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्यांना डेड बॉडी (कॅडेवर) बाबत शिकविण्यात येते. प्रत्यक्ष शिक्षणानंतर वैद्यकीय कौशल्य प्राप्त होऊ शकेल. मात्र प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्यांमध्ये विविध प्रकारची काळजी असते. त्यामुळे त्यांना याबाबतचे महत्व कळत नाही. जेव्हा संबंधित विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीचे विषय शिकतात. तेव्हा त्यांना कॅडेवर लॅबचे महत्व लक्षात येते. वरिष्ठ डॉक्टरांच्या मदतीने टप्प्या-टप्प्याने विद्यार्थी निपूण होतात. मात्र याला खूप वेळ लागतो. कॅडेवर लॅबमध्ये कमी वेळेत समजण्यास मदत होते. देशात केईएम व चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये कॅडेवर लॅब आहे.
मेडिकलमध्ये देहदानानंतर रासायनिक प्रक्रिया करून शव ठेवण्यात येते. परंतु अशा शवावर ऑपरेशन करण्याचे प्रशिक्षण देणे कठीण असते. शव खूप कठोर होते. त्यामुळे कॅडेवर लॅब बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Comments are closed.