मुख्य मार्गावर जीवघेणा खड्डा
कोरची,०२ जानेवारी: येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोरीचे बांधकाम सुरू असून हा मार्ग खुप वर्दळीचा आहे. या मार्गे कोरची मुख्य वस्ती मधुन कोऑपरेटिव्ह बॅक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बॅक आफ इंडिया इत्यादी महत्वाच्या कार्यालयाकडे लोक अहोरात्र जात असतात.
या रस्त्यावर कोऑपरेटिव्ह बॅक च्या समोरच मोरी बांधकाम सुरू आहे. परंतु लोकांना जा-ये करण्यासाठी दुसऱ्या तात्पुरत्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याच रस्त्याने, जिथे एका बाजूस खड्डा आहे तर एका बाजूला झोपडी असल्यामुळे या ठिकाणी केव्हाही अपघात होऊ शकतो.
दुसरा नवरगावाकडे जाणारा मार्ग असून या रस्त्याने कुणीही जात नाही. या रस्त्याने गेल्यास 10 ते 15 मिनीट जास्त खर्च होतात. त्यामुळे अपघाताचा धोका असतांनाही लोक याच मार्गाचा अवलंब करीत आहेत. नगरपंचायत च्या लोकांनी याकडे लक्ष घालून रस्ता खुला करावा. किंवा पर्यायी रस्ता तयार करावा. अशी कोरची येथील नागरिकांची मागणी आहे.
Comments are closed.