Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोहार समाजाच्या मान्यवंराचे सत्कार सोहळा

लोहार समाज संघटना अहेरी चे वतीने

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गुड्डीगुडम/ अहेरी, 10 जुलै –  महाराष्ट्र राज्य लोहार समाज संघटना अहेरी च्या वतीने अहेरी तालुका माजी अध्यक्ष शंकर चंदनखेडे,विद्यमान अध्यक्ष प्रा. विनोद बावणे, कार्याध्यक्ष ऍड. यशवंत मेश्राम यांचे उत्तम सामाजिक कार्याबद्दल जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून गौरविण्यात आले.
अहेरी तालुका माजी अध्यक्ष शंकर चंदनखेडे यांनी शासकीय सेवा देत सामजिक दायित्व पूर्ण करत नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत आणि अहेरी तालुका विद्यमान अध्यक्ष ऍड.प्रा विनोद बावणे यांनी सामाजिक दायित्व उत्तम तऱ्हेने सांभाळीत एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि सिरोंचा तालुक्यातील बामणी येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच कार्याध्यक्ष ऍड. यशवंत मेश्राम यांनी सामाजिक कार्य सांभाळीत वकिली कार्य सुरू केली आहेत.त्या बद्दल अहेरी तालुका शाखेच्या वतीने सन्मानित आले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार राजाराम चे अध्यक्ष रमेश बामनकर यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे, संघटक ईश्वर मांडवकर, उपाध्यक्ष चिंतामण बावणे, कोषाध्यक्ष मनोहर बावणे,युवा कार्यकर्ते राकेश मेश्राम,अहेरी तालुका सचिव सर्व्हेश्वर मांडवकर, राजाराम चे सचिव दिलीप मेश्राम,उपाध्यक्ष राकेश कोसरे, सूर्यनारायण मांडवकर,पेरमिली चे अध्यक्ष रविंद्र औतकर,सचिव रघुनाथ औतकर, इंदाराम चे अध्यक्ष वसंत मेश्राम, सचिव बालचंद्र मेश्राम, लगाम चे आशीष मेश्राम, आदित्य औतकर,एटापल्ली चे नामदेव मांडवकर, साईनाथ चंदनखेडे,महिला शाखा अध्यक्ष शीतल कोसरे,सचिव सारिका मांडवकर तसेच आदी समाज बांधव उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.